वृध्दाचे पैसे लांबविणार्‍या दोघांना पोलिस कोठडी

0

जळगाव। व्यंकटेश नगरातील रहिवासी तुरेबाज बलदार तडवी हे 5 जानेवारी रोजी दुपारी 1.15 वाजता बँक ऑफ इंडिया या बँकेत पासबुक एंन्ट्री भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या पँन्टच्या खिशातून अज्ञात चोरट्यांनी 17 हजारांची रोकड चोरून नेली होती.

यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सोमवारी शहर पोलिसांनी विजयसिंग आनंदराम नट (वय-32, रा. विजयनगर, थाना-कापू, ता.धरमजय गड जि.रागड, छत्तीसगड) व पुष्पेंद्र उर्फ वरूण किशोरीलाल याद (वय-26, रा. नयाटोला जुराबगंज ता.कौडा, जि.कटीयार, बिहार) यांना अटक केली. यावेळी दोघांना मंगळवारी न्या. देवरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. देवरे यांनी दोघांना 6 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. अविनाश पाटील यांनी तर आरोपीपक्षातर्फे अ‍ॅड. अजय सिसोदीया यांनी कामकाज पाहिले.