वृद्ध महिलेच्या पर्समधून सव्वा पाच लाखांचे दागिने लंपास

A woman from Ahmednagar was extended a dowry of 55 lakhs in Jalgaon जळगाव : अहमदनगर येथील वयोवृद्ध महिला नातेवाईकांच्या निधनानंतर जळगावात आल्या असता चोरट्यांनी संधी साधून पर्समधील पाच लाख 25 हजारांच्या दागिण्यांवर डल्ला मारला. जिल्हापेठ पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

पर्समधील दागिणे लंपास
तक्रारदार सरला मदनलाल शेटीया (69, अहमदनगर) या 22 जुलै 2022 रोजी जळगाव शहरातील भगीरथ कॉलनीतील त्यांच्या नातेवाईकांकडे द्वार दर्शनासाठी आल्या होत्या. सरला शेटीया यांच्याकडे असलेल्या पर्समध्ये पाच लाख 25 हजारांचे दागिणे होते मात्र प्रवासादरम्यान त्यांनी पर्स तपासली नाही मात्र भगीरथ कॉलनीत पोहचल्यावर आपली पर्स तपासली असता दागिण्यांची चोरी झाल्याचे लक्षात आले. दागिण्यांची चोरी झाल्याची खात्री झाल्यावर तब्बल तीन महिन्यानंतर सरला शेटीया यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिल्याने बुधवारी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार हे करीत आहेत.