वृद्धाची गळफास घेवून आत्महत्या

भुसावळातील मोहित नगरातील घटना : आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

भुसावळ : शहरातील मोहित नगरातील रहिवासी असलेल्या 72 वषीय वयोवृद्धाने गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवार, 23 रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. पंढरीनाथ दगडू गालफाडे (72, मोहित नगर, भुसावळ) असे मयताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. या प्रकरणी दिगंबर पंढरीनाथ गालफाडे यांच्या खबरीनुसार शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पंढरीनाथ गालफाडे घरातील छताच्या हुकाला साडीने गळफास घेतला. 22 रात्री साडे ते 23 रोजी सकाळी सात दरम्यान ही घटना घडल्याचे पोलिसात नमूद आहे. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली ईरफान काझी करीत आहेत.

Copy