वीस वर्ष देशसेवा करून हेमंत कासार स्वगृही

0

शिंदखेडा:तालुक्यातील पाटण येथील रहिवाशी हेमंत पद्माकर कासार वीस वर्ष देशसेवा करून आपल्या गावी परतले. त्याबद्दल त्यांचे गावात स्वागत करण्यात आले.

येथून जवळच असलेल्या पाटण गावचे रहिवाशी हेमंत पद्माकर कासार मार्च 2000 मध्ये वायुरक्षा रेजिमेंट आर्मी हवालदार पदावर दाखल झाले. वीस वर्ष दोन महिने देशसेवा केली. यात आठ वर्ष जम्मू व काश्मीर, पाच वर्ष मुंबई सहा वर्ष ओरिसा व एक वर्ष मध्य प्रदेश या ठिकाणी त्यांनी सेवा दिली. दोन वर्ष जास्त सेवा कासार यांनी केली.

हेमंत कासार यांनी बारावी पर्यंतचे शिक्षण शिंदखेडा तालुका एजू ट्रस्टच्या एमएचएसएस हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात घेतले होते. वीस वर्ष दोन महिन्यांची देशसेवा व कर्तव्यपूर्ती करून हेमंत सोमवारी पाटण या आपल्या गावी परतले आहेत. कुटुंबातील सदस्यांकडून त्यांचे औक्षण केले. तसेच पाटण ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Copy