वीज पडुन ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

शिरपूर(प्रतिनिधी)खरिप हंगामासाठी शेताची मशागत करतांना अंगावर वीज कोसळल्याने ५० वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शिरपूर तालुक्यातील ताजपुरी शिवारात आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे.गाेपिचंद सुकलाल सनेर पाटील रा.ताजपुरी ता. शिरपूर असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. 
       गाेपिचंद सुकलाल सनेर  सकाळी पत्नी रेखाबाईसह स्वतःच्या मालकीच्या तालुक्यातील आढे शिवारातील शेतात खरिप हंगामाच्या तयारीं साठी शेतातील काडी कचरा वेचून शेताची मशागत करण्याठी गेला होते. दरम्यान   दुपारी 12 वाजेच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होऊन विजांचा कडकडळाट सुरु झाला.त्यावेळी गोपीचंद सनेर हे शेतातील बांधावर निंबाच्या झाडाखाली काम करत होते.अचानक त्यांच्या अंगावर विज कोसळल्याने गोपीचंद सनेर यांचा जागिच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.घटनेनंतर ताजपुरी चे पोलिस पाटील दीपक सनेर यांनी थाळनेर पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून पोलिस घटनास्थळी दाखल होत मृतदेह उत्तरीय तपासणी साठी शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.