वीज ग्राहकांच्या सुविधासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

0

शहादा:येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरणमधील लाइनमन विनायक बोरदे यांनी व्हाटसॲप गृप तयार करुन ग्राहकांना सुविधा व्हावी, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे कर्मचारी तथा लाइनमन विनायक बोरदे यानी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. स्वत: गृप ॲडमिन होत त्यांच्याकडील विकास फिडर व मलोनी फिडरमधील गांधी नगर, एचडीएफसी बँक, विकास शाळा, दीनदयाळ नगर, संभाजी नगर, कुबेर नगर, मनीषा नगर, कुळकर्णी हॉस्पिटल, नितीन नगर ,शारदा नगर, दुरदर्शन, भाजी मार्केट, बोहरी मार्केट, डोंगरगाव रोड, बस स्टॅन्ड, भाऊ तात्या पेट्रोल पंप, गौरी नंदन, विमल नगर, अयोध्या नगर, एन आर आय व्हीला, मलोनी परिसरातील सर्व ग्राहकांचे नंबर गोळा केले. ते एकत्रीत करुन त्याचा एक व्हाटसॲप गृप तयार केला. त्यात संबंधित परिसरात वीज पुरवठा खंडित होणे, वीज बिल भरणा किंवा वीज संबंधित काही तक्रारी असतील तर त्या मांडणे याकामी हा तयार केलेला गृपकामी येत आहे. शिवाय विद्युत पुरवठा खंडित झाला तर तो कश्यामुळे झाला. कुठे झाला त्याला लागणारा वेळ याबाबत सविस्तर माहिती त्या गृपवर देत असल्याने ग्राहकामध्ये समाधान व्यक्त होत आहे.

कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप आदर्शच ठरला

विद्युत पुरवठा खंडित झाला तर ग्राहक लागलीच कार्यालयात तथा संबंधित अधिकारी यांना विचारणा करायचे. त्यामुळे लाइनमन कामात असताना त्याना संबंधित व्यक्तिचा फोन आल्यावर घेणे त्याला माहिती देणे व अश्यात अपघाताचे प्रमाण असायचे. परंतु आता ही माहिती गृपवर मिळत असल्याने ग्राहकांचे फोन होत नाही. यामुळे सर्वांचाच वेळ वाचतो.
शिवाय काही कामानिमित्त पुर्व नियोजित विद्युत पुरवठा खंडित करायचा असल्यास ती माहिती गृपला टाकल्याने ग्राहक मंडळी अगोदरच आपआपली काम करुन घेतात. म्हणजे ही देखील सोय या तयार केलेल्या व्हाटसॲप गृपमुळे झाली आहे. अश्या प्रकारचा गृप हा शहाद्यातील विनायक बोरदे या एकट्या लाइनमनच्या संकल्पेनेतुन तयार झाला आहे. अश्या प्रकारचा गृप हा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील कर्मचाऱ्यांसाठी एक आदर्शच ठरला आहे.

“असा गृप महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्युत कर्मचाऱ्यांनी तयार केला तर खरच ग्राहकांचा व संबंधित विभागाचा ताण कमी होइल. सर्वांसाठी नियोजन करणे सुखकर होईल.”
विनायक बोरदे
लाइनमन, शहादा

Copy