वीज कामगारांनी केले मोटारसायकल रॅली काढून निदर्शने

0

मुक्ताईनगर। शजेहरामध्ये महाराष्ट्र वीज कामगार महासंघ (भारतीय मजदुर संघ) तर्फे कर्मचार्‍यांना दैनंदिन कामकाजात येणार्‍या अडचणींबद्दल मुक्ताईनगर विभागीय अभियंता यांना निवेदन देण्यात आले. तत्पुर्वी मोटारसायकलद्वारे शहर अभियंता कार्यालयापासुन ते मुक्ताईनगर विभागीय कार्यालयापर्यंत घोषणा देत रॅली काढण्यात आली. विभागीय कार्यालयात आल्यानंंतर आपल्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सहाय्यक अभियंता ललीत पटेल यांना देण्यात आले.

यांनी दिले निवेदन
यांच्यासोबत सहाय्यक अभियंता महेश वावरे होते. विभागीय अभियंता हे रजेवर असल्यामुळे सहाय्यक अभियंत्यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी विभागीय अध्यक्ष अभिमन्यु घोगरे, उपविभागीय अध्यक्ष विजय बोंडे, यशराज हंबर्डीकर, दत्तू न्हावकर, गुरुप्रसाद जोशी, सतिष चौधरी उपस्थित होते.

या आहेत मागण्या
रिक्त पदे भरणे, हजारावरील थकबाकी असलेल्या वसुलीकरीता लाईन स्टॉफला जबाबदार धरु नये, वसुलीकरीता पोलीस संरक्षण मिळावे, प्रत्येक कक्षामध्ये स्वच्छता गृह व पिण्याचे पाणी असावे, शेती पंपाचे रीडींग बिल वाटपाची स्वतंत्र व्यवस्था असावी, अनुकंप तत्वावरील सर्व प्रकरणे निकाली काढावी, तांत्रिक कर्मचार्‍यांना आठ तास काम द्यावे, एका कर्मचार्‍याकडे किती ग्राहक असायला पाहिजे हे निश्‍चित असावे, कक्ष प्रमुखाला मिळणार्‍या पेट भत्ता कर्मचार्‍याला मिळावा, मृत कर्मचार्‍याच्या पाल्यास शिक्षणानुसार पात्रता कायम करावी, स्वेच्छा निवृत्ती योजनेअंतर्गत ज्या कर्मचार्‍याच्या दोन वर्षापेक्षा कमी वय असेल अशांना सुध्दा योजनेचा लाभ देण्यात यावा, सर्व कर्मचार्‍यांना वाहन भत्ता द्यावा, महीला कर्मचारी यांच्या नवजात पाल्यांकरीता पाळणा घर असावे अशा मागण्यांचा समावेश आहे.

यांचा होता सहभाग
यावेळी नितीन पाटील, मेघराज पाटील, कपिल वाघ, विनोद पातोंड, मुरलीधर पाटील, समाधान धनगर, अविनाश गोसावी, तुषार बर्‍हाटे, एन.एस. बाविस्कर, आर.एल. भिल, शांताराम सुरवाडे, व्ही.एन. वसावे, डी.आर. हिवरकर व सर्व कर्मचारी हे उपस्थित होते.