Private Advt

वीज कंपनीच्या अभियंत्याला चाळीसगावात मारहाण

भुसावळ/चाळीसगाव : वीजपुरवठा खंडित केल्याचा राग आल्याने ग्राहकाने वीज महावितरण कंपनीच्या सहायक अभियंत्यास मारहाण केली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सहाय्यक अभियंत्यास मारहाण
शहरातील फुले कॉलनीतील धनराज अशोक पाटील या वीज ग्राहकाचा थकबाकी वाढल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता मात्र पाटील यांनी महावितरण कंपनीचे कार्यालय गाठून दोन दिवसांपूर्वीच थकबाकी भरल्याचे सांगत वीजपुरवठा पूर्ववत करण्याबाबत सहा.अभियंता भरत धन्यकुमार उकलकर (42) यांना सांगितले मात्र सहा.अभियंता उकलकर यांनी तुमचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आल्याचे सांगून नवीन वीज कनेक्शन घ्यावे लागेल, असे सांगितले. याचा राग आल्याने धनराज अशोक पाटील यांनी सहायक अभियंता उकलकर यांना अर्वाच्य भाषेत शिविाळ केली. दरम्यान याबाबत पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यासाठी उकलकर हे कार्यालयाच्या बाहेर आले असता पाटील यांनी शिविगाळ करून चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवार, 25 मार्च रोजी दुपारी 1.15 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी उकलकर यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात धनराज अशोक पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आव्हाड हे करीत आहेत.