विहिरीत बुडल्याने तरुणाचा मृत्यू

0

शिरपूर । तालुक्यातील दहिवद येथील रहिवासी तुषार राजेंद्र बागूल (22) या तरुणाचा स्वत:च्या शेतातील विहिरीत पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना दि.6 मे रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस पाटील पंडीत तोताराम पाटील यांनी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेकॉ एन.एस. शेख करीत आहेत.