Private Advt

विस्तारापूर्वी मंत्रिमंडळातून 11 मंत्र्यांनी दिला राजीनामा

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला असून, आज सायंकाळी नवीन मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करणार आहेत. या अगोदर आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय रसायने व खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा, कामगार मंत्री संतोष गंगवार आणि शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्यासह अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे, रावसाहेब दानवे, रतनलाल कटारिया, प्रताप सारंगी आणि देवश्री बॅनर्जी यांनीही केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्यांमध्ये ज्या नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. त्यातील अनेक नेते दिल्लीत पोहचले आहेत. यात ज्योतिरादित्य शिंदे, सर्बानंद सोनोवाल, पशुपति पारस, नारायण राणे आणि वरूण गांधींचा समावेश आहे.

आतापर्यंत 11 मंत्र्यांनी दिला राजीनामा

डॉ हर्षवर्धन (आरोग्यमंत्री)
रमेश पोखरीयाल निशंक (शिक्षणमंत्री)
संतोष गंगवार (कामगार मंत्री)
देबोश्री चौधरी (महिला महिला राज्यमंत्री)
सदानंद गौडा (रसायन व खते मंत्रालय)
संजय धोत्रे (केंद्रीय राज्यमंत्री)
थावरचंद गहलोत
प्रताप सारंगी (राज्यमंत्री)
रतनलाल कटारिया (राज्यमंत्री)
बाबुल सुप्रियो (राज्यमंत्री)
रावसाहेब दानवे पाटील (राज्यमंत्री)