विसावा हॉटेलचे मालक अमळनेर पोलिसांच्या ताब्यात

0

अमळनेर – तालुक्यातील गलवाडे रस्त्यावरील हॉटेल विसावा पार्कवर अमळनेर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत दोन तरुणांसह दोन तरुणी आढळून आले. यावेळी हॉटेलमध्ये दारूच्या बाटल्या देखिल आढळून आले. सदर हॉटेल विसावामधे परमिट रूमचा परवाना नसतांना दारू विक्री होत होती. या हॉटेलचा तरूण-तरूणींसाठी करीता मौज मस्ती करण्यासाठी वापर होत होता. तसेच वेश्या व्यवसायासाठी ही वापरली जात असल्याचा संशय होता. यावेळी पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर, प्रमोद बागडे, किशोर पाटील, सपकाळे, नाजिमा पिंजारी, सुनिल हटकर, प्रमोद पाटील या पथकांनी धडक कारवाई करत एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले.