विसर्जनावेळी पाण्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

0

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील कावळ पिंपरी गावात गणेश विसर्जनाच्या वेळी पाण्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गणेश विसर्जनासाठी गेलेली 6 लहान मुले गावातील तळ्यात बुडाल्याची माहिती मिळताच यातील तीन मुलांना वाचवण्यात यश आले तर तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

गणपती विसर्जन करताना गावातील तळ्यात खोल पाण्याचा अंदाज न आल्याने आणि तळ्यात असलेल्या चिखला मध्ये अडकून बसल्याने या 3 लहान चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. गणेश नारायण चक्कर (8 वर्षे), सुमित सावकार पाबळे (9 वर्षे ), वैभव विलास पाबळे (9 वर्षे ) अशी मृत मुलांची नावे आहेत.

Copy