विष्णू धुरी यांचे व्याख्यान

0

अंबरनाथ – येथील मनोहर कला सांस्कृतिक ट्रस्ट यांचा वतीने उद्या शनिवार ता २९ रोजी सायंकाळी पाच वाजता विष्णू बाळ धुरी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्ट चे प्रमुख विश्वस्त श्रीकांत आठल्ये यांनी दिली.

प्लॉट नंबर ३६०, मनोहर कला सांस्कृतिक ट्रस्ट, श्री दत्त मंदिराजवळ, कानसई विभाग, अंबरनाथ पूर्व येथे सायंकाळी टिक पाच वाजता या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. एम पी एस सी व यु पी एस सी परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास यश कसे मिळवावे यासाठी अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन त्याच प्रमाणे सरकारी नोकरी मिळ्वण्यासाठीचे मार्गदर्शन विष्णू बाळ धुरी हे करणार आहेत. हे व्याख्यान सर्वांसाठी खुले आहे, तसेच प्रवेश विनामूल्य आहे. या संधीचा लाभ विद्यार्थ्यांनी अवश्य घ्यावा असे आवाहन ट्रस्ट चे प्रमुख विश्वस्त श्रीकांत आठल्ये यांनी केले आहे.