विषणापुर आश्रम शाळेत गाडगे महाराजांना अभिवादन

0

चोपडा :  तालुक्यातील विषणापुर आश्रम शाळेत गाडगे महाराज स्मृतीदिनी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
विषणापुर ता. चोपडा येथील शासकीय आश्रमशाळा येथे संत गाडगे महाराज यांची 60 वी पुण्यतिथी विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आली. यात सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवित गाडगे महाराजांच्या संदेश रुजवीत स्मृतिदिनी अभिवादन केले. मंगळवारी
दुपारी 12 वाजता शासकीय आश्रम शाळा विषणापुर येथे प्रारंभी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्यध्यापक रोहन कोचुरे यांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर संत गाडगे महाराजांच्या जीवनावर विद्यार्थी व शिक्षकांची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता पाटील यांनी तर आभार याकूब तडवी यांनी मानले.
दुपारी 3 वाजता गावात व शालेय परिसरात ग्रामस्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात सर्व विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. यात मनोज पाटील , रोहिदास महाजन, कविता पाटील, रोहन कोचुरे, याकूब तडवी आदी शिक्षक तर सुखदेव बाविस्कर , रफिक तडवी , अल्लाउद्दीन तडवी , विनोद तडवी , रशिदा तडवी , खडका पावरा , दस्तागिर तडवी आदी शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला.