विश्‍व हिंदु परिषद व बजरंग दलातर्फे गोशाळेला चारा

0

भडगाव । येथील विश्वहिंदु परिषद व बजरंग दल याच्या माध्यमाने धुळे येथील मातोश्री गौशाळाला अनुसयाबाई दत्तात्रय वाणी, महेश पितांबर चौधरी, भरत पुंडलीक धनगर या शेतकर्‍यांच्या मदतीने दोन ट्रक चारा रवाना करण्यात आला.

त्याप्रसंगी विश्वहिंदु परिषदेचे जिल्हा मंत्री मिलींद बोरसे, विश्वहिंदु परिषदेचे प्रखंड मंत्री नाना हाडपे, गौशाळेचे व्यवस्थापक समाधान पाटील, बजरंग दलाचे कार्यकर्ते पवन पाटील व इतर कार्यकर्तेसह शेतकरी उपस्थीत होते. तालुक्यातुन कुणास ही गौशाळेस चारा दान करावयाचा असेल, तर त्यांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन बजरंग दलातर्फे करण्यात आले.