विश्वचषकासाठी कतारला पाठिंबा

0

नवी दिल्ली : २०२२ मध्ये विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन कतारला होणार आहे. कतारला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

बहारीनच्या एएफसी २०१७ परिषदेमध्ये पटेल यांनी सांगितले की, ‘‘एएफसीचा वरिष्ठ उपाध्यक्ष आणि एआयएफएफचा अध्यक्ष या नात्याने मी कतार फुटबॉल संघटना आणि एससीच्या प्रयत्नांचे समर्थन करतो. नोव्हेंबर २०२२मध्ये कतार फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषविणार असल्याचा आनंद आहे.’’ त्याचबरोबर, कतारमध्ये वास्तव्यास असलेले भारतीय, २०२२ विश्वचषक स्पर्धेला यशस्वी करण्यात नक्कीच मोलाची भूमिका बजावतील, असेही पटेल यांनी या वेळी म्हटले. भारत आणि कतार एकत्रितपणे आशियाला जागतिक फुटबॉलची ताकद बनवतील, असेही पटेल यांनी सांगितले.