विश्‍वचषकासाठी ऑलिम्पिकची मैदाने ?

0

लंडन – पुढील वर्षी क्रिकेटचा विश्वचषक हा इंग्लंड येथे होणार आहे. यासाठी ऑलिम्पिकची मैदाने ही विश्वचषकासाठी वापरण्याचा विचार आयोजकांचा असुन यामुळे तिकीटांचा दर सुध्दा कमी होईल.प्रक्षेषक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. ऑलिम्पिकसाठी तयार करण्यात आलेल्या मैदानांची क्षमता 60 हजार आहे. यातच पुढील विश्वचषक हा इंग्लंडमध्ये होणार आहे. त्यामुळे लंडन ऑलिम्पिकसाठी वापरण्यात आलेली मैदानेच क्रिकेटच्या काही स्पर्धांसाठी वापरण्यात यावी असा विचार द इंग्लिश आणि वेल्स क्रिकेट बोर्ड म्हणजेच इसीबीने केला आहे. गेल्या काळात ज्यांच्याकडे यजमान पद असतो तो विश्वचषक जिंकतो असा एक प्रघात सुरू झाला आहे.

इंग्लंडला आशा जिंकण्याची
2011 ला भारत, 2015 ला ऑस्ट्रेलियने विश्वचषक जिकला आहे. याचमुळे इंग्लंडला ही वाटते आहे की, प्रथमच विश्वचषक आपण जिंकू असा विश्वास इंग्लंडच्या बोर्डाला वाटत आहे. जितके जास्त प्रेक्षक तितका जास्त खेळाडूंचा उत्साह वाढेल असे त्यांना वाटते.त्याच कारणामुळे काउंटी क्रिकेट मैदानांवर स्पर्धा आयोजित करण्यापेक्षा लंडन ऑलिम्पिकसाठी वापरण्यात आलेली मैदानेच क्रिकेट स्पर्धासाठी वापरावी असा इसीबी विचार करित आहे. इंग्लंडमधील क्रिकेट मैदानपेक्षा
ऑलिम्पिक मैदानाची प्रक्षेषक बसण्याची संख्या जास्त आहे. जर ऑलिम्पिकची मैदाने घेतली तर आपल्याला तिकीटांची किंमत कमी करता येईल जेणेकरुन प्रेक्षकांच्या संख्येत वाढ होईल असा एक विचार इसीबी करीत आहे. या निर्णयामुळे काउंटी क्रिकेट मैदानाचे व्यवस्थापक नाराज झाले आहेत. मैदानाची क्षमता कमी असेल ती वाढविण्याची जबाबदारी ही इसीबीने त्याकडे लक्ष द्यावे. या मैदानांऐवजी ऑलिम्पिकच्या मैदानावर स्पर्धा झाल्यास आमच्यावर व चाहत्यावर अन्याय होईल असे मत मैदानाचे व्यवस्थापकांनी व्यक्त
केले आहे.

मैदानाचा अजूनही शोध
इसीबीने जर असा निर्णय घेतला असेल तर क्रिकेट चाहत्यांची फसवणूक असेल असे म्हणून विश्वचषकासाठी वेगवेगळ्या मैदानाची पाहणी करीत आहेत आणि कोणकोणती मैदाने स्पर्धेसाठी योग्य आहेत याचा विचार आम्ही करीत असल्याचे विश्वचषकाच्या आयोजन समितीचे व्यवस्थापकीय संचालक स्टीव एलवर्दी यांनी सांगितले. आमच्या बैठकी सुरू आहे. त्यामुळे जो काही निर्णय होईल तो आम्ही लवकरच माध्यमांना जाहीर करू असे एलवर्दी म्हटले.