विवेक ऑबेरॉयच्या घरावर छापेमारी

0

मुंबई : सध्या बॉलीवूड मागे चांगलेच ग्रहण लागले आहे. ड्रग्स प्रकरणी अनेक कलाकारांची चौकशी झाली. त्यात प्रामुख्याने अभिनेत्रींचा समावेश आहे. दरम्यान आता बॉलीवूड अभिनेता विवेक ऑबेरॉयच्या मुंबई येथील घरावर छापेमारी झाली आहे. बंगळूर सेन्ट्रल क्राईम ब्रांच अर्थात सीसीबीने छापेमारी केली आहे. विवेक ऑबेरॉयच्या पत्नीचा भाऊ आदित्य अल्वा हा ड्रग्स प्रकरणात आरोपी आहे. मात्र तो सध्या फरार आहे. तो विवेकच्या घरी असल्याची माहिती मिळाल्यानंतर बंगळूर सीसीबीने विवेकच्या घरी छापा टाकला आहे. सीसीबीने कोर्टाकडून अटक वॉरंट आणला आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सुरु झालेल्या तपासादरम्यान ड्रग्स प्रकरणी देखील तपास करण्यात आला. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ड्रग्स प्रकरणात अटक देखील झाली. त्यानंतर बॉलीवूड ड्रग्स प्रकरणात दिग्गज कलाकारांचे नावे समोर आली आहेत. यात अभिनेत्री दीपिका पदुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह यांची चौकशी झाली.