विवेकानंद विद्यालयात दहावीच्या विद्यार्थांचा निरोप समारंभ

0

चोपडा । येथील विवेकानंद विद्यालयात इ.10वी. च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ झाला. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वती व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून शालेय प्रार्थनेने झाली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, माजी अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनशाम अग्रवाल, सचिव अ‍ॅड. रविंद्र जैन, कार्यवाहक सुधाकर केंगे, विश्वस्ता मंगला जोशी, सर्व विभागाचे मुख्याध्यापक उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांनी प्रास्ताविक केले. “सर्व विद्यार्थांनी या पूढे यशाकडे अखंड झेप घ्यायची..” या समूहगीत सादर केले.

मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत

हर्षल पाटील, तेजल पाटील, दर्शना पाटील सह उपशिक्षक पवन लाठी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे उपाध्यक्ष घनशाम अग्रवाल , माजी अध्यक्ष डॉ. विकास हाताळकर, कार्यवाहक सुधाकर केंगे, अध्यक्ष डॉ. विजय पोतदार यांनी भावी आयुष्यासाठी उपयोगी असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपशिक्षक संदिप कुळकर्णी, आभार प्रसाद वैद्य यांनी तर फलक लेखन कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी केले. कार्यक्रमास इ.10वी चे सर्व विद्यार्थी, विद्यालयातील सर्व विभागातील शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला.