विवेकानंद युवा फाऊंडेशनला बहिणाई युवाशक्ती पुरस्कार

0

चोपडा । येथील स्वामी विवेकानंद युवा फाऊंडेशनला बहिणाई युवाशक्ती सन्मान पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. महिलांच्या सर्वागीण विकासासाठी कार्य करणार्‍या सामाजिक संस्था, महिला मंडळ, शैक्षणिक संस्था यांचा गौरव बहिणाबाई युवाशक्ती पुरस्कार देण्यात येत असतो.  या वर्षीचा जळगाव येथील भरारी फाऊंडेशनच्या वतीने बहिणाबाई युवाशक्ती पुरस्कार २०१७ देण्यात येत आहे.  त्यासंबंधीचे पत्र संस्थेला प्राप्त झाले आहे. ११ ते १५ फेब्रुवारी दरम्यान सागर पार्कवर बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. चोपडा येथील स्वामी विवेकानंद युवा फाऊंडेशन संस्था सामाजिक विकासाच्या क्षेत्रात प्रभावी  कार्य करीत आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र शिंपी यांच्यासह सर्व पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले जात आहे.