विवेकानंद नगरात चोरट्यांचा डल्ला

0

जळगाव । शहरातील विवेकानंद नगरातील बंद बंगल्यातून चोरट्याने 52 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना आज उघडकी आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याने घरफोडीची कबूली देत 45 हजार रुपयांचा मुद्देमाल काढून दिला आहे. विवेकानंद नगरातील केरोसीन डेपोजवळील टिचर अल्डा प्ला कसी ली धरम यांच्या बंद बंगल्यातून 4 ते 5 मार्च दरम्यान अज्ञात चोरट्याने डल्ला मारीत लॅपटॉप, सोन्याचे दागिने, एलईडी टिव्ही असा 52 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी प्रिन्स हेन्री पिल्ले यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रामानंदनगर पोलिसांनी या घरफोडीतील संशयित चोरटा राजेंद्र उर्फ सोफराज्या दत्तात्रय गुरव याला अटक करून कसून चौकशी केली असता त्याने घरफोडीची कबूली दिली आहे. दरम्यान, त्याने पोलिसांना लॅपटॉप व इलईडी टिव्ही असा 45 हजार रुपयांचा मुद्देमाल काढून दिला आहे.