विविध समाज संघटनांच्या प्रमुखांचा हिंदु राष्ट्र स्थापना

0

जळगाव : येथील विविध समाज संघटनांच्या प्रमुखांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार एका बैठकीत व्यक्त केला. तसेच हिंदु समाजावर होणार्‍या आघाताच्या विरोधात कृतीशील होण्याचा मानसही बोलून दाखवला. जळगावातील विविध समाज संघटनांच्या प्रमुखांची एकत्रित बैठक जाहीर हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने 23 डिसेंबर या दिवशी आयोजित केली होती. या बैठकीत शहरातील मराठा, कुंभार, बेलदार, भावसार, जैन, नाभिक, सुतार, परीट, राजपूत आदी समाजाचे तसेच समाज संघटनांचे प्रमुख उपस्थित होते. याचसमवेत सनातन संस्थेचे संत पू. नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक सुनील घनवट आणि समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर हेही उपस्थित होते.

धर्मांधांवर आर्थिक बहिष्कार टाकण्याचा ठराव
बैठकीची सुरुवात जळगावनगरीचे ग्रामदैवत प्रभु श्रीराम यांच्या चरणी वंदन करून झाली. सुनील घनवट यांनी सभेची आवश्यकता स्पष्ट करतांना म्हणाले, “इंग्रजांनी जातीचे राजकारण करून हिंदु समाज ‘हिंदु’ म्हणून एकत्र येऊ दिला नाही. त्यामुळे आपण सर्वजण आज विविध जातीत विभागले गेलो आहोत. आज सर्वांना एक ‘हिंदु’ म्हणून एकत्र होणे आवश्यक आहे. आज हिंदु समाजावर होत असलेल्या धर्मांतरण, लव्ह जिहाद, गोहत्या यांसारख्या समस्यांना आळा घालण्यासाठी हिंदु राष्ट्राशिवाय पर्याय नाही.” बैठकीला उपस्थित समाज बांधवांनी एकमुखाने धर्मांधांवर आर्थिक बहिष्कार टाकून त्यांचा आर्थिक कणा मोडण्याचा निर्धार केला. भावसार समाजाचे पंकज भावसार, सुनील भावसार; कुंभार समाजाचे चंद्रशेखर कापडे, कुमावत बेलदार समाजाचे शेखर कुमावत, मराठा समाजाचे प्रवीण पाटील, जैन समाजाचे नरेंद्र जैन, बारा बलुतेदार संघटनेचे राज्य संपर्कप्रमुख राजकुमार गवळी, नाभिक समाजाचे गुलाबराव सोनावणे, सुतार समाजाचे विलास सांगोरे, राजपूत समाजाचे पिंटू राजपूत, परीट समाजाचे चेतन शिरसाळे, योग वेदांत समितीचे राजेश म्हस्के.