विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत सोनिया गांधींची बैठक; उद्धव ठाकरेंची दांडी

0

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला घेरण्याच्या उद्देशाने विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलविली आहे. आज बुधवारी राज्यांच्या जीएसटीतील वाटा, देशभरात जेईई एनईईटी परीक्षा स्थगित करण्यासहीत अनेक मुद्यांवरही डिजिटल बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी मंगळवारी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना संपर्क करण्यात आला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र या बैठकीला हजर राहणार नाही, त्यांनी तसे कळविले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासहीत इतर मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहतील.

बुधवारी दुपारी २.३० वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. काँग्रेसकडून अनेकदा आग्रह करण्यात आल्यानंतरही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी होणार नसल्याचे बोलले जात आहे.

Copy