विविध मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी कोरोनाचा बाऊ; सपा खासदार

0

नवी दिल्ली : भारत देशात दिवसेंदिवस कोरोना विषाणू बाधितांची संख्या वाढत असून, आतापर्यंत कोरोनामुळे ४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. जनता कर्फ्यूच्या आवाहनानंतर आझमगडचे माजी खासदार समाजवादी पक्षाचे नेते रमाकांत यादव यांनी बेताल वक्तव्य केले आहे. रमाकांत यादव यांनी म्हटले आहे की, कोरोना म्हणजे एक प्रकारचा छळ आहे. एनआरसी, सीएए आणि महागाईच्या मुद्द्यावरून भरकटवण्यासाठी कोरोनाचा बाऊ केला जात आहे.

तसेच जगात कोरोना असू शकतो, मात्र भारतात नाही. एवढेच नाही, तर आपण कोरोना संक्रमित व्यक्तीला छातीशी लावायलाही तयार असल्याचे म्हटले आहे. या वक्तव्यानंतर रमाकांत यादव यांच्यावर टीका केली जात आहे.