विवाहित महिला बेपत्ता

0

आळंदी : रहात्या घरातून कोणाला काहीही एक न सांगता विवाहित महिला बेपत्ता झाली आहे. या घटनेची फिर्याद गणेश नवनाथ डाके (वय 28,रा.घुंडरे आळी,आळंदी ) यांनी दिली आहे. विवाहित बेपत्ता महिलेचे नाव विशाखा गणेश डाके (वय 22,रा.आळंदी ) असे आहे. वर्णनात रंग गोरा, उंची 165 से.मी., नाक सरळ, कानात रिंगा, मंगळसूत्र, अंगामध्ये लाल रंगाचा सलवार कुर्ता आहे. वरील वर्णनाची महिला कोणास आढळल्यास आळंदी पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Copy