Private Advt

विवाहितेला छळले : पतीसह तिघांविरोधात गुन्हा

जळगाव : शहरातील मुक्ताईनगरातील माहेर असलेल्या विवाहितेला शिविगाळ व मारहाण करून छळ करण्यात आला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात पतीसह सासू सासर्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरोधात गुन्हा दाखल
शिवानी संकेत पाटील (24, एसएमआयटी कॉलेजजवळ, मुक्ताईनगर, जळगाव) यांचा विवाह जामनेर येथील संकेत पुंडलिक पाटील यांच्याशी 10 नोव्हेंबर 2019 रोजी रीतीरीवाजानुसार झाला. लग्न झाल्यापासून पती यांनी काहीही कारण नसताना शारीरीक व मानसिक त्रास देवून मारहाण करण्यास सुरूवात केली तसेच सासू आणि सासरे यांनीदेखील मानसिक त्रास देऊन शिवीगाळ केली. या त्रासाला कंटाळून विवाहिता जळगाव येथे माहेरी निघून आल्या. सोमवार, 11 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर पती संकेत पुंडलिक पाटील, सासु प्रतिभा पुंडलिक पाटील, सासरे पुंडलिक बाबुराव पाटील (सर्व रा. वाकी रोड, जामनेर) यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल निलेश भावसार करीत आहे.