विवाहितेची बसमध्ये छेड : जमावाने तरुणास चोपले

The Yavalkars chased the married woman and harassed her in the bus यावल : सावदा येथून एका विवाहितेचा एस.टी.त पाठलाग करीत तिची छेड काढणार्‍यास यावल बसस्थानकावर नागरीकांना चांगलाच चोप दिला. संशयीतास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 32 वर्षीय शेख शोहेब हा संशयीत चिनावलचा रहिवासी असून त्याच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

विवाहितेची काढली छेड
सावदा येथून विवाहिता एस.टी.बसद्वारे चोपडा तालुक्यात जात असताना तिचा पाठलाग संशयीत सोहेब शेख मुक्तार (32, रा.चिनावल, ता.रावेर) या तरुणाने करीत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला व छेडही काढली. बस यावल आगारात आल्यानंतर पीडीतेने नागरीकांना घडलेला संतापजनक प्रकार सांगत नागरीकांची मदत मागितली. संतप्त नागरीकांनी शेख सोहेब यास चांगलेच चोपून काले. संशयीताने जमावाच्या तावडीतून पळ काढला मात्र नागरीकांनी पाठलाग करून त्यास पकडत यावल पोलिसांच्या स्वाधीन केले. यावल पोलिसात महिलेने आपबिती सांगितल्यानंतर पोलिसांनी संशयीताविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली.