विवाहितेचा ५० लाख, २० तोळे सोन्याच्या दागिन्यांसाठी छळ;

0

जळगाव – अमळनेर येथील सासर तर शहरातील शिवकॉलनी येथील माहेर असलेल्या विवाहितेला प्लॅटसाठी ५० लाख आणि २० तोळे सोन्यासाठी शारिरीक छळ व मारहाण केल्याप्रकरणी तिच्या पतीसह सासरच्या ११ जणांवर रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, पीडीत विवाहिता हिचे अमळनेर येथील मनिष ज्ञानेश्वर बाविस्कर यांच्या सोबत दीड वर्षांपुर्वी रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले. पती अमेरीकेतील एका नामांकित कंपनीत असल्याचे सासरच्या मंडळींनी सांगितले होते. सुरूवातीचे काही दिवस चांगले गेले. एक दिवस मनिष दारूपिऊन घरी आल्यानंतर ‘लग्नाच्या आधी मला तुझ्या वडीलांनी व्हीजा करू दिला नाही, मी तुला लग्नाच्या अधीच अमेरिकेत घेवून जाणार होतो’ असू म्हणून पिडीतासह तिच्या आईवडीलांना शिवीगाळ केली. तर सासु ज्योती चौधरी, मावस सासु आशालता चौधरी यांनी भडकावून शिवीगाळ केली. त्यानंतर पिडीताच्या माहेरच्या मंडळींनी समजविण्याचे अनेक प्रयत्न केले. दरम्यान नोकरीसाठी अमेरीकेला निघून गेला. इकडे आपल्याला अमेरिकेला केव्हा घेवून जाणार असे तगादा लावला असता तिला शिवीगाळ केली. तर तुझ्या नातेवाईकांना जीवेठार मारेल आणि तुझ्या अंगावर ॲसिड टाकून देईल अशी धमकी दिली. दरम्यान, पती मनिष ज्ञानेश्वर बाविस्कर, सासु ज्योती आधार चौधरी, मावस सासरे शंकर रामदास चौधरी, मावस सासु आशालता शंकर चौधरी, आजल सासु रूख्मीनीबाई आधार चौधरी, मावस दीर आशिष शंकर चौधरी, मामा दिपक आधार चौधरी, मामा गिरीष आधार चौधरी सर्व रा. केशव नगर, अमळनेर, मावस सासु वत्सलाबाई पंढरीनाथ चौधरी, मावस सासरे पंढरीनाथ चौधरी दोघे रा. चोपडा, मावस ननंद रोहिणी संदीप चाधरी आणि नंदोई भाऊ संदीप मुरलीधर चौधरी अश्यांनी अंगावरील सर्व दागीने काढून पुण्यात प्लॅट घेण्यासाठी ५० लाख रूपये आणि २० तोळे सोने घेवून आल्यावर सासरी घेवून जावू अशी धमकी दिली.

पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून पती मनिष ज्ञानेश्वर बाविस्कर, सासु ज्योती आधार चौधरी, मावस सासरे शंकर रामदास चौधरी, मावस सासु आशालता शंकर चौधरी, आजल सासु रूख्मीनीबाई आधार चौधरी, मावस दीर आशिष शंकर चौधरी, मामा दिपक आधार चौधरी, मामा गिरीष आधार चौधरी सर्व रा. केशव नगर, अमळनेर, मावस सासु वत्सलाबाई पंढरीनाथ चौधरी, मावस सासरे पंढरीनाथ चौधरी दोघे रा. चोपडा, मावस ननंद रोहिणी संदीप चाधरी आणि नंदोई भाऊ संदीप मुरलीधर चौधरी यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Copy