विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू

0

जळगाव – दोन दिवसांपासून श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागलेल्या महिलेचा रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असतांना मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत शहर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील गेंदालाल मिल परीसरात राहत असलेल्या शारदा नरेंद्र नाडे (वय-20) या गरोदर विवाहितेला पोटात दुखत असल्याने जिल्हा रूग्णालयात 12 ऑक्टोंबर 2018 रोजी उपचारार्थ दाखल केले होते. बाळंपण सुखरूप झाले मात्र गेल्या दोन दिवसांपासून श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागला होता. रविवार 14 ऑक्टोंबर 2018 रोजी सकाळी 9.45 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. वैदयकिय अधिकारी डॉ.अमित पाटील यांच्या खबरीवरून शहर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Copy