विवरे बुद्रुक गणात राष्ट्रवादी पक्षाचा ‘होम टू होम’ प्रचार

0

रावेर । पंचायत समितीच्या विवरे बुद्रुक गणातून राष्ट्रवादी पक्षातर्फे योगेश सोपान पाटील निवडणुक लढवित असून त्यांच्या प्रचार रलीत अनेकांचा सहभाग नोंदवला आहे. असून हायटेक व मतदारांच्या होम टू होम प्रचार केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष सोपान पाटील यांचे पुत्र असून पाटील यांनी अनेक वर्षांपासून गोरगरीबांच्या समस्या सोडविल्या आहे. नागरिकांसाठी वाचनालये, अनेक प्रश्‍नांवर आंदोलने केल्यामुळे त्यांचा जनसंपर्क असून आता विवरा, रावेर ग्रामीण, वाघोड या गावांमधून त्यांचे पुत्र उमेदवारी करीत आहे.

विवरा, रावेर ग्रामीण, वाघोड येथे युवकांची साथ
विवरे बुद्रुक येथील युवकांचा मोठा फौजफाटा राष्ट्रवादीचे उमेदवार योगेश पाटील यांच्या पाठिशी असून आतापर्यंत निघालेल्या रॅलीत पाटील यांना प्रतिसाद मिळाला आहे. संपूर्ण गण ढवळून निघाला प्रचाराच्या माध्यमातून काढण्यात आला आहे. जागोजागी महिला औक्षण करतांना दिसत असून अशीच परिस्थिती रावेर ग्रामीण, वाघोड येथे सुध्दा आहे.

संधी देवून बघा सोने करण्यासाठी कटीबद्ध
जनतेने मला संधी दिल्यास प्रथम आरोग्याच्या दृष्टीने काम करण्यास तत्पर राहील. विवरे, रावेर ग्रामीण, वाघोड येथे शुध्द पाण्यासाठी प्रयत्न, गटारीचे व्यवस्थापन, शेतकर्‍यांना विविध योजनांचा लाभ मिळविणार यासह संजय गांधी, रेशन कार्ड, रस्ते, अंगणवाड्यासाठी हायटेक प्रणाली व्हावी, यासाठी प्रयत्न करेल. यासाठी राष्ट्रवादी पक्षातर्फे उमेदवार असून निवडून आल्यास दिलेल्या संधीचे सोने करेल.