विवरेनजीक रीक्षा उलटल्याने महिलेचा मृत्यू

0

रावेर : बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर अपघाताचे सत्र कायम असून गुरुवारीदेखील रीक्षा उलटल्याने विवरा येथील प्रवासी महिलेचा मृत्यू झाला तर अन्य दोन सहप्रवासी जखमी झाले. सगीराबी शेख सकुर (45, रा.विवरा) असे मयत महिलेचे नाव आहे. रीक्षासमोर अचानक आलेल्या कुत्र्यामुळे हा अपघात घडल्याचे समजते. या अपघातात मनोहर पितांबर तायडे (47, जळगाव) व नाजीम बी.हाफिस खान (71, रा.विवरे बुद्रुक) या गंभीर जखमी झाल्या आहेत.15 रोजी पपईने भरलेले आशयर पलटी होऊन 15 जणांचा मृत्यु झाला व त्यानंतर पुन्हा 16 रोजी महामार्गाला लागून असलेल्या अजंदेनजीक खड्डा चुकवतांना एकाचा मृत्यू झाला होता.

Copy