विरोधी पक्षनेते फडणवीस उद्या सकाळी ९ वा. जिल्ह्यात येणार

जळगाव – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उद्या दि. १ रोजी जिल्हा दौर्‍यावर येत असुन सकाळी ९ वा. जामनेर येथे त्यांचे आगमन होणार आहे. मंगळवारी सकाळी ९ वा. जामनेर येथून मोटारीने मुक्ताईनगरकडे ते प्रयाण करणार असुन स. ९.४५ वा. मुक्ताईनगर ग्रामीण रूग्णालयाला भेट देणार आहेत. त्यानंतर शेमळता, मेंढळदा, नायगाव, रावेर तालुक्यातील ऐनपूर, सुलवाडी, कोळदा, धामोडी, वाघाडी, तांदळवाडी येथील शेती पिकांच्या नुकसानीची ते पाहणी करणार आहे. दुपारी २ वाजेनंतर ना. फडणवीस हे जालनाकडे प्रयाण करणार आहेत.