Private Advt

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या नोटीसची होळी

महाविकास आघाडी सरकारचा निषेध

जामनेर – माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जामनेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज नगरपरिषद समोरील राजमाता जिजाऊ चौकात नोटीसची होळी करण्यात आली.तसेच आघाडी शासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना कटकारस्थान रचून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा शासनाचा डाव विधानसभेत पेन ड्राइवच्या माध्यमातून उघड केल्याने तसेच पोलीस बदल्यांचा झालेला मोठा घोटाळा यासंदर्भात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेचा गैरवापर करत मुंबई पोलीसांनी चौकशीसाठी नोटीस बजावली. अधिवेशन काळात फडणवीस यांनी अनेक आजी माजी मंत्र्याचे काळे कारनामे अगदी पुरावे सहीत विधानसभा अध्यक्षाकडे सुपूर्द केले. त्याच्याच राग म्हणून महाविकास आघाडी सरकार ने पोलीसांना हाताशी धरून सुडबुद्धीने नोटीस बजावली त्या नोटीसचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जामनेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने नोटीसची होळी करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील उपनगराध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील मनपा गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे , तुकाराम निकम डॉ संजीव पाटील, नगरसेवक महेंद्र बावस्कर, बाबूराव हिवराळे, अतिश झाल्टे ,नाजिम पार्टी, खलील शेख, दीपक तायडे ,रवींद्र झाल्टे ,निलेश चव्हाण ,कैलास पालवे ,गणेश चौधरी, संजय मोरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते