विरोधकांकडून मला अडकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न : माजी मंत्री एकनाथराव खडसे

Opponents say, ‘Kuch to huraniwala hai, nothing like this will happen’ : Former Minister Eknathrao Khadse जळगाव : नाथाभाऊला काही तरी करून जेलमध्ये टाकायचे आणि निवडणुका सुलभ करायच्या हा विरोधकांचा प्रयत्न आहे मात्र जनता गेली 40 वर्षे माझ्यासोबत आहेत, आणि यापुढेही माझ्यासोबत राहिल यामुळेच मी सर्वांचे हे प्रयत्न हाणून पाडतो आहे. राज्यातील सर्व विरोधक म्हणतात म्हणे कुछ तो होणेवाला है,कुछ तो होणेवाला है असे काही होणार नाही मात्र मै तुम्हारे उरा पे बैठनेवाला हूँख मला कितीही त्रास दिला तरी मी तुमच्या उरावर बसणार आहे, असा इशारा जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात खडसेंनी  (Former Minister Eknathrao Khadse) दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मी तर सर्वांच्या उरावर बसेल
खडसे पुढे म्हणाले की, विरोधकांकडून सातत्याने माझा छळ सुरू आहे, मला अडकविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व विरोधक म्हणतात म्हणे कुछ तो होणेवाला है, कुछ तो होणेवाला है असे काही होणार नाही मात्र मै तुम्हारे उरा पे बैठनेवाला हूँ. मला कितीही त्रास दिला तरी मी सर्वांच्या उरावर बसेन, असा हल्लाबोलही त्यांनी सरकारवर केला.

शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता
आमदार रवी राणांनी केलेल्या आरोपांवर बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मला 7 ते 8 आमदारांचे फोन आले तेही यामुळे नाराज आहेत, 1 तारखेपर्यंत पुरावे दिले नाही तर 7 ते 8 आमदारांना घेऊन निर्णय घेणार असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले होते. यावर बोलताना एकनाथराव खडसे म्हणाले की, बच्चू कडू यांची ही सुरुवात आहे त्यामुळे शिंदे गटात गेल्या बंडखोरांमध्ये अस्वस्थता आहे. हळूहळू ही अस्वस्थता बाहेर येत आहे. बच्चू कडू यांच्या माध्यमातून ही सुरुवात आहे, असा दावा खडसे  (Former Minister Eknathrao Khadse)  यांनी यावेळी केला.