विरावली शिवारात वीज कोसळून महिला ठार

दुर्घटनेने हळहळ : मयत महिला नावरे गावातील रहिवासी : शेतात निंदणी करताना कोसळली वीज

यावल : शेत शिवारात निंदणीचे काम सुरू असतानाच अचानक वीज कोसळल्याने तालुक्यातील नावरे गावातील विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवार, 23 जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास विरावली शिवारात घडली. रीना सुनील मेढे (39) असे विवाहितेचे नाव आहे.

शेतात कोसळली वीज
रीना मेढे या नावरे गावातील रहिवासी असून त्यांच्या सासुच्या नावे विरावली शिवारातील शेत गट क्रमांक 122 मध्ये शेत असून त्यात त्या निंदणी करीत असताना गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह पाऊस सुरू झाला व पावपासून स्वतचा बचाव करण्यासाठी रीना सुनील मेढे या एका वृक्षाखाली थांबल्या मात्र त्यांच्या अंगावर कोसळली आणि त्या जागीच गतप्राण झाल्या. घटना घडताच महिलेला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी यावलचे तहसीलदार महेश पवार यांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी विरावली येथील तलाठी हेमंत मारोडे यांनी पंचनामा केला. ग्रामसेवक मजीत तडवी, पंढरी अडकमोल यांनी पंचनामा केला. यावल पोलीस ठाण्यात उत्तम भोजु मेढे यांनी दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार किशोर परदेशी, संजय देवरे, राजेंद्र पवार, जनार्दन महाजन यांनी पंचनामा केला.