विराट कोहली फलंदाजीमधील सर्व विक्रम मोडेल

0

पुणे: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा चॅम्पीयन प्लेयर आहे. विराट फलंदाजीमधील सर्व विक्रम मोडेल असा विश्वास भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंहने व्यक्त केला आहे. पुण्यात आयोजित लिटरेचर फेस्टिवल ‘स्‍पोर्टेल’मध्ये हरभजन बोलत होता. सध्याचा विराटचा फॉर्म अप्रतिम आहे, तो एक गुणी खेळाडू असून सर्व रेकॉर्ड तोडेल असे भज्जीने सांगितले.

सचिन- विराट तुलना चुकीची
सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यातील सर्वोत्कृष्ट कोण? असा प्रश्न भज्जीला विचारला असता त्याने त्यावर कोहली हा चॅम्पियन प्लेयर आहे असे तो म्हणाला मात्र, सचिनच नेहमी नंबर वन राहील हे सांगायला तो विसरला नाही. विराट फलंदाजीमधील सर्व विक्रम मोडेल अशी अपेक्षा त्याने यावेळी व्यक्त केली पण सचिन सचिनच राहील असे तो म्हणाला. विराट आणि माझ्यासह देशातील बहुतांश जणांनी सचिनला पाहूनच खेळण्यास सुरूवात केली. तुम्ही विराटला विचारले तर तोही हेच म्हणेल असे भज्जी म्हणाला. सध्या विराट आणि सचिन या दोघांमध्ये तुलना करण्याचे प्रकार वाढत आहेत. मात्र ही तुलना चुकीची असून दोघे त्यांच्या ठिकाणी ग्रेट आहेत असे भज्जीने सांगितले.