विराटने पराभवाचे खापर फलंदाजांवर फोडले

0

पुणे – कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघाच्या पराभवाचे खापर फलंदाजांवर फोडले आहे. आमची फलंदाजी अशीच राहिली तर ऑस्ट्रेलियाच नव्हे, तर जगातील कोणताही संघ आमचा पराभव करेन, असे त्याने म्हटले आहे. फलंदाजांवर खापर फोडणाऱ्या विराटने मात्र गोलंदाजांचे कौतुक केले. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, असे तो म्हणाला. गेल्या दोन वर्षांतील फलंदाजांची ही सर्वात खराब कामगिरी असल्याचे तो म्हणाला. अशीच कामगिरी राहिली तर जगातील कोणताही संघ आम्हाला हरवू शकेन, अशी नाराजी त्याने व्यक्त केली. पहिला डाव १०५ धावांत आटोपला.

आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र, फलंदाजांनी या सामन्यात खूपच खराब कामगिरी केली, असेही तो म्हणाला. या सामन्यात मी गोलंदाजांना दोष देणार नाही. मात्र, आमच्या फलंदाजांनी साफ निराशा केली. आमचा पहिला डाव १०५ धावांतच आटोपला. त्यामुळे सामन्याच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या आव्हानांचा डोंगर पार करणे सोपे नव्हते. पण आम्ही चांगला खेळ केला नाही असेच म्हणावे लागेल, असेही विराट म्हणाला. आम्ही चांगली कामगिरी केली नाही तर पराभव होणारच, हे आम्हाला माहितच होते. या सामन्यात असेच काहीसे झाले, असेही तो म्हणाला. या सामन्यात पराभव झाल्यानंतर बेंगळुरू कसोटीत वापसी करू, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.