विराटने चाहत्यांना दिला मैदानात परतण्याचा संदेश

0

नवी दिल्ली । टीम इंडिया आणि आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीने ट्विटरवर चाहत्यांसाठी एक संदेश दिला आहे. यातून त्याने आपण लवकरच मैदानात परतणार असल्याचे यावेळी कमेन्टने दिले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसर्‍या सामन्यात दुखापतग्रस्त झाल्याने विराटच्या आगामी आयपीएल 10 मध्ये खेळण्यावरुन प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. या दुखापतीमुळे त्याच्या चाहत्यांमध्येही कमालीची नाराजी पसरली होती. त्यानंतर विराटने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करुन चाहत्यांना लवकरच मैदानात परतणार असल्याचं सांगितलं आहे. या व्हिडिओमध्ये विराटसोबत एक डॉगी दिसतही दिसत आहे.

डॉक्टरांचा सल्ला न मानता चाहत्यांसाठी लवकरच येणार
कर्णधार कोहलीने सांगितले की, एकाच कारणामुळे मला कुत्रे प्रचंड आवडतात. सध्या मी मैदानात परतण्यासाठी प्रचंड परीश्रम घेत असून माझ्यासोबत हा कुत्राही आहे. मीही मैदानात परतण्याच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे या कठीण प्रसंगातही मला साथ देल्याबद्दल माझ्या चाहत्यांचे आभार मानतो. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की, तुम्ही आरसीबीला सपोर्ट करत राहा. मी लवकरच मैदानात परतणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतील रांचीमधील तिसर्‍या सामन्यात विराटच्या खांद्याला दुखापत झाली. यामुळे तो शेवटच्या आणि महत्त्वाच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. पण तरीही इतर खेळाडूंनी हा सामना जिंकून मालिका खिशात घातली. दरम्यान, खांद्याच्या दुखापतीमुळे जोपर्यंत तो 100 टक्के बरा होत नाही, तोपर्यंत मैदानात न उतरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यामुळे चाहत्यांध्येही नाराजी पसरली होती. पण आता आपण लवकरच मैदानात परतणार असल्याची माहिती त्याने व्हिडिओच्या माध्यमातून दिल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.