विराटच्या विक्रमी द्विशतकाने धावांचा डोंगर

0

हैदराबाद : एकमेव कसोटी सामन्यासाठी आलेल्या पाहुण्या बांगलादेश संघाच्या गोलंदाजांची अक्षरशा लक्तरे काढत भारताने विराट धावसंख्या उभा केली आहे. सामन्यावर भारताने जबरदस्त पकड मिळविली असून धडाकेबाज कर्णधार विराट कोहलीचे द्विशतक, मुरली विजय आणि शेवटी वृद्धिमान सहाच्या शतकी खेळीच्या आधारावर भारताने 6 बाद 687 धावांवर पहिला डाव घोषित केला. या तिघांसोबतच अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि रविंद्र जडेजाच्या अर्धशतके देखील महत्वाची ठरली. भारताच्या 687 एवढ्या बलाढ्य धावसंख्येचे आव्हान घेऊन दुसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशला अवघी 14 षटके खेळायला मिळाली. बांगलादेशने दिवसअखेर 1 बाद 41 अशी धावसंख्या केली. या सामन्यात भारतीय संघाकडून अनेक विक्रम स्थापीत करण्यात येत आहे. कर्णधार विराट कोहलीने या द्विशतकासह सलग चार कसोटी मालिकेत चार द्विशतक बनविण्याचा नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. आधी न्यूझीलंड आणि नंतर इंग्लंडविरूद्ध कमालीचे वर्चस्व गाजवणाऱ्या विराट सेनेने आता बांगलादेशविरुद्ध देखील जोरदार कामगिरी करत मोठ्या विजयाचा पाया रचला आहे.

विराट, साहा, अजिंक्य, जडेजा वनडे स्टाईल

बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताने चांगली सुरूवात केली होती दुसऱ्या दिवशी भारताने सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली. विराट कोहलीने धावांचा पाऊस पाडत खणखणीत द्विशतक ठोकले. त्याने 24 चौकारांच्या सहाय्याने 246 चेंडूत 204 धावा करत विक्रम प्रस्थापित केला. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा विराट खेळी करत तो कसोटीत उत्कृष्ट खेळाडू असल्याचे सिद्ध करून दाखविले आहे. शुक्रवारी बांग्लादेश विरोधात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसर्‍या दिवशी विराटने द्विशतक करून अनेक विक्रम मोडित काढत नवीन विक्रम प्रस्थापीत केले आहेत. विराट कोहलीने 243 चेंडूत 200 धावा केल्या. मात्र,द्वितशक ठोकल्यानंतर विराट कोहली 204 धावांवर बाद झाला. यानंतर वृद्धिमान सहाने दोन षटकार आणि सात चौकरांच्या सहाय्याने 155 चेंडूत नाबाद 106 धावा केल्या. तर चेतेश्‍वर पुजारा (177 चेंडूत 83 धावा) आणि अजिंक्‍य रहाणे (133 चेंडूत 82 धावा) करत डावाला आकार देण्यास मदत केली. रविंद्र जडेजानेही 2 षटकार आणि 4 चौकारांच्या सहाय्याने 78 चेंडूत 60 धावा केल्या. बांगलादेशच्या वतीने तईजूल इस्लामने तीन बळी घेतले. तर मेहेदी हसनने दोन आणि टस्किन अहमदने एक बळी घेतला.

ब्रॅडमॅन, द्रविडचा रेकॉर्ड मोडला

या सामन्यात भारतीय संघाकडून अनेक विक्रम स्थापीत करण्यात येत आहे.कर्णधार विराट कोहलीने या द्विशतकासह सलग चार कसोटी मालिकेत चार द्विशतक बनविण्याचा नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी हा विक्रम महान फलंदाज आणि ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू ब्रॅडमॅन आणि राहुल द्रविड यांच्या नावावर तीन मालिकेत तीन द्विशतक बनविण्याचा विक्रम होता. कोहली यांच्या विक्रमाची एक विशेष बाब म्हणजे बांग्लादेशाच्या विरोधातील पहिल्या मालिकेतील पहिल्या कसोटीतच त्याने द्विशतक ठोकले आहे. तसेच ही पाचवी वेळ आहे, जेव्हा विराट कोहलीने सलग शतक करून 150 धावांचा आकडा पार केला आहे. कोहलीची कसोटीत सर्वोत्कृष्ट खेळी 235 धावांची आहे, जी त्याने मागीलवर्षी इंग्लंडविरोधात खेळली होती. 54 कसोटीत सामान्यात 16 शतक आणि 14 अर्धशतक ठोकणार्‍या कोहलीची सरासरी 52 पेक्षा जास्त आहे.

बांगलादेशाचा डाव दिवसअखेर 1 बाद 41

भारताने पहिला डाव सहा बाद 687 धावांवर घोषित करण्यात केल्यानंतर बांगलादेश विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यातील बांगलादेशाचा डाव दिवसअखेर 1 बाद 41 धावांवर आटोपला. बांगलादेशचा फलंदाज तामीन इक्बाल आणि मोमीनल हक धावपट्टीवर खेळत आहेत. तर बांगलादेशला पहिला धक्का भारताचा गोलंदाज उमेश यादव याने सौम्य सरकार याला बाद करुन दिला. सौम्य सरकार अवघ्या 15 धावा काढून तंबूत परतला. तामीन इक्बाल 24 आणि मोमीनल हक एका धावेवर खेळत असून बांगलादेशाच्या 14 षटकात एक बाद 41 धावा झाल्या आहेत. इक्बाल ने सुरुवातीपासून सावध फलंदाजी करीत खेळपट्टीवर जम बसविण्याचा प्रयत्न केला. त्याने वैयक्तिक 50 ची सरासरी (स्ट्राईक रेट) राखत 48 चेंडूंत 24 धावा केल्या. शनिवारी तिसऱ्या दिवशी बांगलादेश भारताला प्रत्युत्तर देण्यात कितपत यशस्वी होते याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.