विराज नन्नवरे, राहुल माळी प्रथम

0

जळगाव- चित्तपावन मंडळातर्फे नुकतीच सरिता अभ्यंकर स्मृती गीतगायन स्पर्धा झाली. या स्पर्धेत 30 जणांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत लहान गटात प्रथम विराज नन्नवरे, द्वितीय आशुतोष सूर्यवंशी, मोठ्या गटात प्रथम राहुल माळी, द्वितीय भाग्यश्री भंगाळे हे विजेते ठरले. भुवनेश्वरी गावंडे हिला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. बक्षीस वितरणप्रसंगी आयएमआर महाविद्यालयाचे प्राचार्य विवेक काटदरे हे उपस्थित होते. परीक्षण कैलास कोष्टी, किरण सोहळे, मनोज कुळकर्णी, गौरी कुळकर्णी, गायत्री कुळकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन समिधा सोवनी यांनी केले.