विमा कंपन्यांच्या फायद्यासाठीच राज्य सरकारचे निकष

0

 

खा. रक्षा खडसे यांचा महाविकास सरकारवर आघाडीवर हल्ला

जळगाव:प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी केंद्र सरकार निधी व मार्गदर्शक सूचना देते. राज्य सरकार प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे निकष ठरवते. शेतकर्‍यांशी कुठलीही चर्चा न करता राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने विमा कंपन्यांचा फायदा करणारे निकष ठरविले असल्याचा हल्ला भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केळी पीक विमा विषयावर बोलताना पीक विम्याचे निकष केंद्र सरकारने ठरवले असल्याचे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावर भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांनी जोरदार आक्षेप घेत महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढविला आहे.

Copy