विमानतळाचा विकासच नाही – कॅगचे ताशेरे

0

मुंबई – देशतील छोटी शहरे, जिल्हे विमानसेवेने जोडण्यासाठी केंद्र सरकारने उडान योजना जाहीर केली आहे. मात्र, राज्यातील विमानतळ विकासाकडे राज्य सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे मत कॅगने आपल्या अहवालात नोंदवले आहे.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अर्थात एमएडीसीला विमानतळ विकासासाठी दिलेला निधी वापरला नसल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे. तसेच काही ठिकाणी अनावश्यक खर्च झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. कॅगने आपल्या अहवालात पाच विमानतळ विकासाबाबत माहिती दिली असून, या विमानतळांचा विकास करण्यासाठी एमएडीसीने विशेष काही काम केले नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच जमीन संपादनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले, मात्र विमानतळांचा विकास केला नाही, असा निष्कर्षही कॅगने आपल्या अहवालात मांडला आहे.

केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात विमानसेवेने जोडण्यासाठी राज्यातील ज्या विमानतळांचा समावेश केला आहे, त्या विमानतळांचाही विकास अद्याप झाला नसल्याचे या अहालावरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, अमरावती, सोलापूर, शिर्डी अशा विमानतळांच्या विकासासाठी जमीन संपादित करूनही या विमानतळांचा विकास झालेला नसल्याची माहितीही कॅगच्या या अहवालात उघड झाली आहे.