विभागीय शरीरसौष्ठव स्पर्धेकरीता जिल्हा संघ जाहीर

0

जळगाव। महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोसिएशन या शासन मान्यताप्राप्त राज्य संघटनेच्या मान्यतेने उत्तर महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटना व नाशिक जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेतर्फे पद्मश्री कर्मवीर काकासाहेब यांच्या स्मृतिप्रित्यर्थ के.के.वाघ शिक्षण संस्था नाशिक यांच्या वतीने व अजिंक्य वाघ यांच्या पुढाकाराने उत्तर महाराष्ट्रस्तरीय अर्थात विभागीय ‘कर्मवीर उत्तर महाराष्ट्र श्री 2017’ या विभागीय अजिंक्यपद रोख पारितोषिकांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन शनिवार 4 फेब्रुवारी रोजी के.के.वाघ शिक्षण संस्था (अभियांत्रिकी कॅम्पस) अमृतधाम पंचवटी नाशिक येथे करण्यात आलेले आहे. जळगाव जिल्हा संघ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन येथील जिल्हा असोसिएशनची व्यायामशाळा श्री साईबजरंगजिममध्ये आयोजन करण्यात आले होते.

निवड झालेला संघ पुढीलप्रमाणे
धीरज जाधव (रेक्स जीम भुसावळ), अन्वर खान (मध्यरेल्वे डीएसए भुसावळ), कुलजीतसिंग (जिगर फिटनेस), सागरगिरी (जिगर फिटनेस), नोएलखान (जिगर फिटनेस भुसावळ), किरणसिंग परदेशी (श्री साईबजरंगजिम, जळगाव), मयुर जावळे (सुमो हेल्थक्लब, जळगाव), रवि वंजारी (पोलिस जिम, जळगाव), जावेद शेख लाला (श्री साईबजरंग जिम जळगाव), मोहसीन शेख (श्री साईबजरंग जिम, जळगाव), टिम मॅनेजर राजेश बिर्‍हाडे, जळगाव, टिम कोच जितेंद्र गिरी भुसावळ.

मोहन एन.चव्हाण, संस्थापक जळगाव जिल्हा बॉडीबिल्डर्स असोसिएशन, श्री साईबजरंग जिम जळगाव, संघटन सचिव महाराष्ट्र बॉडिबिल्डर्स असोसिएशन, संतोष राम सेाहाणे, सचिव जळगाव जिल्हा बॉडिबिल्डर्स असोसिएशन, राजेश बिर्‍हाडे प्रशिक्षक व सदस्य जळगाव जिल्हा बॉडिबिल्डर्स असोसिएशन, सुनिल पाटील, सेल्स मॅनेजर जळगाव जिल्हा दूध विकास संघ, जळगाव, अक्षय चव्हाण संचालक श्री साईबजरंग जिम जळगाव आदी मान्यवर उपस्थित होते. जळगाव जिल्हा संघ निवड चाचणी जिल्हाभरातून 32 शरीरसौष्ठव पटूंनी सहभाग घेतला.