विना परवाना व गावठी दारू अड्ड्यावर छापा

0

चाळीसगाव । शहरातील स्टेशन रोड भागात घर व दुकानात विना परवाना देशी-विदेशी दारूचा साठा करून विक्री होत असल्याची गुप्त माहीती शहर पोलीस निरीक्षक आदीनाथ बुधवंत यांना मिळाल्यावरून त्यांचय मार्गदर्शनाखाली गुरूवार 2 फेब्रुवारी 2017 रोजी सपोनि राजेंद्र रसेडे व पथकाने हनुमानवाडी येथे छापा मारून 1100 रूपये रोख व 27 हजार 550 रूपयाच्या देशी विदेशी दारू साठ्यासह एकास अटक केली आहे. तर तालुक्यातील ओढरे गावी नाल्याच्या काठी असलेल्या गावठी दारू तयार करण्याच्या हातभट्टी वर चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी दि. 1 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 9:10 वाजता छापा मारून 20 हजार 800 रूपये किमतीचे गावठी दारू तयार करण्याचे रसायन सह गावठी दारू जागेवर नाश करून एकास ताब्यात घेऊन त्याचे विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

ओढरे येथे गावठी हातभट्टी वर छापा; एकास अटक
तालुक्यातील ओढरे गावी नाल्याच्या काठी गावठी दारू तयार करण्याची भट्टी असल्याची गुप्त माहीती ग्रामीण पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांना मिळाल्यावरून दि. 1 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 9:10 वाजता पो.नि. सुनिल गायकवाड, स.पो.नि. दिपक बोरसे, हवालदार मनोहर जाधव, पोलीस नाईक शशिकांत महाजन, पो.कॉ. विनोद भोई, ज्ञानेश्वर बडगुजर यांनी छापा मारून 20 हजार 800 रूपये किमतीचे गावठी दारू तयार करण्याचे साधने, हातभट्टी, 2 हजार लिटर गावठी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, 20 लिटर तयार रसायन व 210 लिटर तयार गावठी दारूसह आरोपी युवराज रामभाऊ सुर्यवंशी (60) रा. रांजणगाव ता चाळीसगाव यास ताब्यात घेतले आहे. गावठी दारू तयार करण्याचे रसायन व तयार दारू जागेवर नाश करून हातभट्टी व दारूची साधने यांची जागेवर तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक शशिकांत महाजन यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आरोपी युवराज रामभाऊ सुर्यवंशी याचे विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

रोख रकमेसह एकास अटक
पोलीस निरीक्षक आदीनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र रसेडे, डि.बी. चे हवालदार शशिकांत पाटील, पो.ना.संदीप तहसीलदार, पो.कॉ.राहुल पाटील, संजय पाटील यांनी दि. 2 पेैब्रवारी 2017 रोजी दुपारी 1:30 वाजता स्टेशन रोड लगत असलेल्या हनुमानवाडी येथे शेखर दशरथ कदम यांच्या दुकानावर जावून विना परवाना विक्री करण्यासाठी कब्जात बाळगून ठेवलेला 9 हजार 100 रूपये किमतीचे देशी संत्रा 4 बॉक्स, 9 हजार 600 रूपये टँगो 4 बॉक्स, 3 हजार 375 रूपये किमतीचे व्हाईट चिप्स 25 बाटल्या, 1 हजार 600 रूपये किमतीचे मॅकडॉल रम 13 बाटल्या, 2 हजार 100 रूपये किमतीच्या क्लास ओडका 14 बाटल्या, 375 रूपये किमतीच्या बॅगपायपर 3 बाटल्या, 375 रूपये किमतीच्या ऑफीसर चॉईस 3 बाटल्या असा एकुण 27 हजार 550 रूपये किमतीचा देशी विदेशी दारूचा साठा व 1 हजार 100 रूपये रोख सह आरोपी शेखर दशरथ कदम (48) रा. हनुमानवाडी चाळीसगाव यास अटक करण्यात आली आहे. त्याचे विरोधात पो.कॉ. राहुल पाटील यांचे फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला करावाई करण्यात आली आहे. तपास चाळीसगाव शहर पोलीस करीत आहे.

तरवाडे येथे शेतीच्या वादातून एकास मारहाण; गुन्हा दाखल
चाळीसगाव । तालुक्यातील तरवाडे येथे शेती वाटणीच्या वादावरून व चुलत बहीणीला भांडण करण्यासाठी पाठवले या कारणावरून एकाची मोटारसायकल अडवून त्यास तालुक्यातील तरवाडे येथील साईबाबा मंदीराजवळ व जवळपास तीन ठिकाणी मारहाण केल्याची घटना दि. 31 जानेवारी 2017 रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास घडली असून या मारहाणीत फिर्यादीचा मोबाईल, सोन्याची अंगठी व 1 हजार 500 रूपये रोख पडून नुकसान झाले आहे. जखमी फिर्यादीच्या खाजगी रूग्णालयात दिलेल्या जबाबावरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तरवाडे येथील 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील तरवाडे येथील मुळ रहीवासी व सध्या राहणार चाळीसगाव मधुकर चिंतामन मराठे (56) धंदा शेती यांच्याकडे त्यांची चुलत बहीण इंदुबाई यांना आरोपींनी भांडण करण्यासाठी पाठवले या कारणावरून 31 जानेवारी 2017 रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास त्यांची मोटारसायकल (एम.एच.19 ए.व्ही. 5642) आरोपी निंबा चिंतामन पावले, सोपान निंबा पावले, अरूण चिंतामन पावले तिघे (रा. तरवाडे ता. चाळीसगाव) यांनी अडवून दुपारी 12:30 वाजता साईबाबा मंंदीराजवळ रोडवर तसेच माध्यमिक विद्यालयाचे मोरीजवळ शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आरोपी सोपान निंबा पावले याने त्याच्या हातातील लाकुड मधुकर मराठे यांच्या डोक्यावर छातीवर, हाता-पायावर मारून दुखापत केली. त्यानंतर आरोपींनी त्यांना मोटारसायकल वर उचलून नेवून बोरखेडा धरणावर मारहाण केली तसेच शेतीची समान वाटणी केली नाही तर तुला जिवंत सोडनार नाही असा दम दिला. या मारहाणीत त्यांचा मोबाईल, सोन्याची अंगठी व रोख रक्कम 1 हजार 500 रूपये पडून त्यांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी त्यांनी येथील भडगाव रोड वरील शिेंद अ‍ॅक्सीडेंट हॉस्पीटल मध्ये दिलेल्या जबाबावरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला वरील तिघा आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.