विना अनुदानित शिक्षकांचा पेपर तपासणीला बहिष्कार

0

जळगाव । अनुदान मागणीसाठी प्राध्यापक आक्रमक: 20 मार्च पासून मुंबई येथे आमरण उपोषण विनाअनुदानित शिक्षकांचा पेपर तपासणी बहीष्कार?गेली पंधरा वर्षापासून विनावेतन अध्यापनाचे कार्य करणारे राज्यातील हजारो विनाअनुदानीत कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक शासनाच्या विनाअनुदानीत धोरणाविरुध्द चांगलेच संतापले असून बारावीच्या उत्तर पत्रिका न तपासण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य विनाअनुदानीत उच्च माध्यामिक कमवि शाळा कृती समितीच्या माध्यमातून राज्यव्यापी असहकार आंदोलन केले जात आहे.

अनुदान तत्व लागू करण्याकरीता उच्चमाध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे ऑनलाईन, आफलाईन मुल्यांकन करुन झाले. तीन वर्षे झाले अजुन पात्र शाळांचा याद्यांचा पत्ता नाही. अशा या शासनाच्या कारभाराविरुध्द शिक्षकांमध्ये प्रचंड रोष दिसत आहे.

शासन अनुदानपात्र शाळांची यादी व शिक्षकांना शंभर टक्के वेतन सूरु करत नाही तोपर्यंत पेपर तपासणीवरील बहीष्कार मागे नाही. अशी भूमीका उच्च माध्यमीक कमवि शाळा कृती कृतिसमीतीने घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व विनाअनुदानीत उच्चमाध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, प्राध्यापकांनी आंदोलनामध्ये मोठ्या संखेने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कृति समीती प्रमुख प्रा. अनिल परदेशी व पदाधीकारी प्रा.विनोद वाघ, प्रा.पराग पाटील, नारायण पाटील, योगेश चौधरी, एन.डी. पाटील, योगेश पाटील, हुसेन शेख, गुलाब साळुंखे, दिनेश पाटील, सुधीर चौधरी, जितेंद्र पाटिल, प्रा.मनोज पवार, बी.जे.बोरसे, विजय ठोसर, महेंद्र पाटिल, संजय पाटील यांनी केले आहे.