विनायक फडके यांचा केला विशेष सन्मान

0

वयाच्या 85 व्यावर्षी दोन ग्रंथ लिहिले

चिंचवड : शरीराला वार्धक्य येऊ शकते, पण इच्छाशक्तीला कधीच नाही. चिंचवडच्या विनायक पुरुषोत्तम फडके यांनी वयाच्या 85 व्या वर्षी दोन ग्रंथ लिहून याचीच प्रचिती दिली. त्याबद्दल गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि मन करा रे प्रसन्न ट्रस्ट यांच्यावतीने फडके यांचा नुकताच विशेष सन्मान करण्यात आला. गांधीपेठ तालीम मित्र मंडळ आणि मन करा रे प्रसन्न ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवडमध्ये प्रवचन मालिका आयोजित केली होती. त्यामध्ये ज्येष्ठ निरुपणकार डॉ. संजय उपाध्ये यांच्या हस्ते विनायक फडके यांना विशेष सन्मान प्रदान करून गौरविण्यात आले. गीतातत्व दर्शन खंड एक व खंड दोन असे दोन ग्रंथ लिहिल्याबद्दल त्यांचा हा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. उपाध्ये यांनी फडके यांच्या लिखाणाविषयी गौरवोद्गार काढले. फडके यांचे लिखाण अभ्यासपूर्ण आणि लेखनशैली ओघवती असून सर्वांनी हे ग्रंथ आवर्जून वाचावेत.

दीड वर्षापासून ग्रंथाचे काम सुरु

या ग्रंथांबाबत माहिती देताना फडके म्हणाले की, गेल्या दीड वर्षापासून ग्रंथाचे काम सुरु आहे. ते आज कुठे फळाला आले. आतापर्यंत 7 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात मराठी दासबोध, सार्थ आत्माराम, ज्ञानेश्‍वरी, आरोग्यासाठी मंत्र, आरोग्यदायी दिनचर्या अशी पुस्तके प्रकाशित झाली आहे. गीतातत्वदर्शन खंड एक व खंड दोन यामध्ये पाच ग्रंथ एकत्र करुन खंड लिहिले आहेत. त्यात भगवतगीता श्‍लोक, श्‍लोकाचा अर्थ, अभंग ज्ञानेश्‍वरी, ज्ञानेश्‍वरीतील टीका आदींचा अभ्यास करुन तो ग्रंथामध्ये मांडला आहे. 2006 पासून विविध विषयावरील ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली.

Copy