विनाअनुदानित शाळांमधील कर्मचार्‍यांना अनुदान वाटप

0

नंदुरबार । जिल्ह्यांतील विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना 20 टक्के अनुदानाचे वाटप जिल्हा परिषदतर्फे वितरीत करण्यात आले. राज्यातील गेल्या 12 ते 14 वर्षांपासून विनाअनुदानित तत्वावर सुरू असलेल्या शाळांना मार्च 2014 ते जून 2016 दरम्यान राज्य शासनाकडून 20 टक्के अनुदानाकरीता पात्र ठरविण्यात आले, त्यात नंदुरबार जिल्ह्यांतील 38 शाळा व 180 वर्ग तुकड्यांवरील कर्मचार्‍यांना 20 टक्के वेतन अनुदानाचे वितरण करण्यात आले. राज्यात 2002 नंतर कायम विनाउनदानित तत्वावर सुरू असलेल्या शाळांचा कायम शब्द 2009 साली वगळण्यात आला. यानंतर 2012 साली या शाळांचे मूल्यांकन करण्यात आले. अटी-शर्तींची पुर्तता करून 2014 ते 2016 दरम्यान शाळांना 20 टक्के शाळांना अनुदानाकरिता पात्र ठरविण्यात आले होते. यानुसार 31 मार्च 2017 अखेर या शाळांना प्रत्यक्ष अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. यात नंदुरबार जिल्ह्यांतील 38 शाळांमधील 161 शिक्षक व 122 शिक्षकेतर कर्मचार्‍यांना तसेच 180 वर्ग तुकड्यांवरील 193 शिक्षकांना सरसकट अनुदानाचे 20 टक्के वितरीत करण्यात आले आहे. याप्रक्रीयेत शिक्षणाधिकारी(माध्यमिक) जी.एन. पाटील, वेतन अधिक्षका मिनाक्षी गिरी, लेखाधिकारी कचरे, तसेच माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.