विनाअनुदानित शाळांनी 20 टक्के अनुदानासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

0

जळगाव : शासनाने राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांना सरसकट 20 टक्के अनुदान लागु केले आहे. विना अनुदानित आणि अनुदानासाठी पात्र असलेल्या शाळांनी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 5 ते 11 जानेवारी दरम्यान अनुदानासाठी प्रस्ताव पाठविण्याचा कार्यक्रम शासनातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील 78 शाळांनी आतापर्यत शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. शासन निर्णयाप्रमाणे अनुदानासाठी प्राप्त असलेल्या शाळांची विद्यानिकेतन शाळेत शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबीराच्या माध्यमातून या शाळांचे प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार करुन घेतले आहे. 11 अटींची पुतर्ता करणार्‍या शाळांची 20 डिसेंबर पर्यत तपासणी करण्यात येणार असून अनुदान पात्र अंतिम यादी घोषीत करण्यात येणार आहे. नागपूर विधीमंडळाच्या बैठकीत राज्यातील कायम विनाअनुदानित तत्त्वावर कार्यरत असलेल्या शाळांना लागलेला कायम विनाअनुदानित शब्दातील कायम शब्द काढून सरसकट 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.