विनयभंग गुन्ह्यात 6 महिने सक्तमजुरी

0

भुसावळ। धावत्या रेल्वेत झोपलेल्या तरुणीचा विनभंग करणार्‍या पुणे येथील युवकास येथील रेल्वे न्यायालयाने 6 महिने सक्त मजुरीची शिक्षा, 4 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 2 महिने सक्त मजुरीची सुनावली आहे. पिडीत युवती हि 11 मार्च 2008 रोजी आझाद हिंद एक्सप्रेसच्या एस. 8 या बोगीतून पुणे ते राहूळखेडा प्रवास करत असतांना त्या बोगीतुन प्रवास करणार्‍या दत्ता वैद्यनाथ कचरे (वय 24, रा.वर्जे, पुणे) याने पिडीत तरुणीच्या बर्थवर जावून ती झोपेत असतांना तीचा विनयभंग केला होता. यानंतर रेल्वे पोलीसांनी त्यास अटक केली होती.

यानंतर पिडीत युवती ओरडून उठल्याने तो पळून जावून लपून बसला. त्या युवतीने त्याच बोगीतील तीच्या मैत्रीणीला फोनकरुन घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी रेल्वेच्या गार्डला बोलावून गाडीच्या गार्डला घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. या गाडीत असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानास बोलवून आरोपीस ताब्यात घेण्यात आले व भुसावळ येथील रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रल्हाद देठे व बबन शिंदे यांनी करुन आरोप पत्र सादर केले. खटल्यात 4 साक्षीदार तपासण्यात आले. युक्तीवाद पुर्ण झाल्यानंतर न्यायाधीश राहुल थोरात यांनी आरोपी दत्ता कचरे यास 6 महिने सक्त मजुरीची शिक्षा, 4 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 2 महिने सक्त मजुरीची शिक्षा. 4 हजार रुपये दंड भरल्यास पिडीत युवतीस भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.सुभाष कासार यांनी काम पाहिले.