विधीसेवा योजनाविषयी जनजागृती अभियान

0

जळगाव । ग्रामीण व शहरी भागातील जनतेला कायद्याविषयक माहिती व्हावी तसेच विविध योजनांविषयी माहिती मिळावी या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण संचलित कादरीया मल्टीपर्पज फाऊंडेशन व सहयोग बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती व मार्गदर्शन अभियान राबविण्यात आले. रविवारी 15 रोजी आव्हाणे ग्रामपंचायत येथून अभियानास सुरुवात करण्यात आली. कादरीया फाऊंडेशनचे अध्यक्ष फारुक कादरी यांनी महिलांवर होणार्‍या अत्याचाराबाबत कायदेविषयक मार्गदर्शन करीत ग्रामीण व शहरी भागात जनजागृती अभियान सतत राविण्याचे आश्‍वासन दिले.

आव्हाणे ग्रामपंचायतीतून अभियानास प्रारंभ
सहयोग सामाजिक संस्थेचे सचिव अरविंद काकडे यांनी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणद्वारा सर्व सामान्यांना विधी सेवा झटपट निकाल व लोकन्यायालयाबबत मार्गदर्शन केले. महिला व बालके यांच्यासाठी लागु असलेल्या कायद्याविषयी यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी आव्हाणे ग्रामपंचायत सदस्य सुनिल मोरे, सय्यद जहूर, असलम पिंजारी, हुकुमचंद पाटील, रशिंद पिंजारी, गोकुळ सपकाळे, नामदेव पाटील, शेख अजीज, गोपाल चौधरी, मुरलीधर सपकाळे, उत्तम पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फारुक कादरी, अरविंद काकडे, सैय्यद अली, रज्जाक शेख, कैलास पाटील, कैलास जोशी, मतीउल्ला शेख, रशिद बागवान, इकबाल शेख, शकील खाटीक, अफजल लोहार आदींनी परिश्रम घेतले.